-
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या घरी सध्या लग्नाची घाईगडबड सुरू आहे.
-
त्यांची सुपुत्री रेवती सुळे ही नागपूरचे प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी यांचे चिरंजीव सारंग लखानी यांच्यासोबत लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
-
अरुण लखानी हे सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही असून, या नव्या नात्यामुळे दोन्ही कुटुंबांत आनंदाचे वातावरण आहे.
-
दरम्यान, आज आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी देशातील वाढत्या महागाईवर आणि तेलाच्या टंचाईवर भाष्य केले.
-
त्यानंतर एका वेगळ्या विषयावर बोलताना सुळे म्हणाल्या की, “गंमत म्हणून तुम्हाला सांगते, हा काही प्रेस कॉन्फरन्सचा मुख्य विषय नाही.
-
माझे जे व्याही आहेत त्यांनी नागपूर येथे होणारा रिसेप्शनचा मोठा कार्यक्रम सध्या पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
-
त्यांच्याकडे साधारण तीन ते चार हजार पाहुणे येणार होते, पण माननीय प्रधानमंत्र्यांनी केलेल्या आवाहनामुळे त्यांनी हा निर्णय घेतला.
-
लग्न ठरले आहे तर ते आम्ही करूच, पण रिसेप्शन नंतर कधीही करता येईल, असे म्हणत लखानी कुटुंबाने हा सोहळा पुढे ढकलल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले.
-
(सर्व फोटो सौजन्य: सुप्रिया सुळे/इन्स्टाग्राम)
“अनेक जोडप्यांसाठी आदर्श आहेत….”, भाग्यश्रीने केलं रितेश-जिनिलीयाचं कौतुक; ‘राजा शिवाजी’च्या सेटवरचे किस्से सांगत म्हणाली…