-
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि सदानंद सुळे (Sadanand Sule) यांची कन्या रेवती सुळे (Revati Sule) आज (२० जून) विवाहबंधनात अडकणार आहे.
-
नागपूरचे प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी (Arun Lakhani) यांचे सुपुत्र सारंग लखानी (Sarang Lakhani) यांच्याशी रेवतीची लग्नगाठ बांधली जाणार आहे.
-
या भव्य विवाहसोहळ्यापूर्वी काल (१९ जून) त्यांचा हळदीचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
-
सध्या या हळदी सोहळ्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
सारंग लखानी हे एक यशस्वी तरुण उद्योजक असून, ते ‘विश्वराज ग्रुप’चे कार्यकारी संचालक (Executive Director) म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
-
व्यवसाय सांभाळण्याबरोबरच त्यांना खेळाचीही प्रचंड आवड आहे. ते स्वतः एक उत्तम बॅडमिंटनपटू आहेत.
-
आज पार पडणाऱ्या या विवाहसोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेक दिग्गज नेते व मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुप्रिया सुळे/इन्स्टाग्राम)
रमेश म्हात्रेच्या भेटीसाठी डोंबिवलीतील समर्थक गोव्यात; अंजुनी रिसाॅर्टवर भेटण्यासाठी व्यावसायिक वाहनांची सोय