-
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची सुकन्या रेवती आज, २० जून रोजी एका शाही सोहळ्यात विवाहबंधनात अडकत आहेत.
-
नागपूरमधील नामांकित उद्योगपती अरुण लखानी यांचे चिरंजीव सारंग लखानी यांच्यासोबत रेवती सुळे हिची लग्नगाठ बांधली जाणार आहे.
-
या दिमाखदार विवाहसोहळ्याची सुरुवात म्हणून काल शुक्रवार, १९ जून रोजी हळदीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
-
हळदीच्या कार्यक्रमानंतर कालच रेवती आणि सारंग यांच्या लग्नाचा दिमाखदार संगीत सोहळाही झाला.
-
या संगीत सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास उपस्थिती दर्शवली होती.
-
राजकीय नेत्यांसोबतच बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान यानेही या संगीत कार्यक्रमाला हजेरी लावून सोहळ्याची शोभा वाढवली.
-
भाजप नेते व प्रसिद्ध अभिनेते रवी किशनदेखील या आनंदोत्सवात नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
-
राजकीय आणि मनोरंजन विश्वातील दिग्गज मंडळींच्या उपस्थितीमुळे सुळे आणि लखानी परिवाराचा हा सोहळा चांगलाच चर्चेत आला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: सुप्रिया सुळे/इन्स्टाग्राम)
अग्रलेख: नुसतेच निदान