-
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे हिचं २० जून रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटरमध्ये अगदी थाटामाटत लग्न झालं.
-
प्रसिद्ध उद्योगपती, सिनेइंडस्ट्रीतील मंडळी, सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळींनी या लग्नाला हजेरी लावली होती.
-
एवढ्या झगमगाटी लग्नात रेवती आणि तिचा पती सारंग लखानी यांच्या पेहरावाने लक्ष वेधून घेतलं.
-
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या मंगळसूत्राची सर्वाधिक चर्चा झाली.
-
काळे मणी आणि दोन वाट्या इतकं साधं आणि मिनिमल मंगळसूत्र तिने परिधान केलं आहे.
-
तिच्या या साधेपणामुळेच नवऱ्या मुलीकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं.
-
तिने परिधान केलेलं मंगळसूत्र आजच्या आधुनिक काळातील स्त्रियांसाठी फॅशन स्टेटमेंट ठरू शकेल.
-
रेवती सुळेच्या लग्नातील अनेक फोटो आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.
-
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि सुपुत्र पार्थ पवार यांनीही या कौटुंबिक सोहळ्याला उपस्थिती लावली होती.
गॅस अॅसिडिटी कधीच होणार नाही, सकाळीच पोट झटक्यात होईल साफ; फक्त आठवड्यातून दोनदा ‘ही’ भाजी खा