-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार पक्ष) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या कन्या रेवती सुळे (Revati Sule) यांचा विवाहसोहळा २० जून रोजी अत्यंत दिमाखात पार पडला.
-
रेवती यांनी नागपूरचे प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी (Arun Lakhani) यांचे सुपुत्र सारंग लखानी (Sarang Lakhani) यांच्याशी लग्नगाठ बांधली.
-
मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे रंगलेल्या या शाही विवाहसोहळ्याला राजकीय, व्यावसायिक आणि बॉलिवूड जगतातील अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती.
-
दरम्यान, सध्या सोशल मीडियावर रेवती सुळे यांच्या हळदी सोहळ्यातील लूकची जोरदार चर्चा रंगली आहे.
-
प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आंचल ठक्कर हिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर रेवती यांच्या हळदी सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.
-
या खास दिवसासाठी रेवती यांनी अत्यंत सुंदर अशा पिवळ्या रंगाच्या पारंपरिक नऊवारी साडीची निवड केली होती.
-
या पिवळ्या नऊवारी साडीवर रेवती यांनी मराठमोळा साज केला होता. त्यांच्या गळ्यातील पारंपरिक मोहनमाळ, ठुशी, नथ, हातातील सोन्याच्या बांगड्या आणि आकर्षक कानातले त्यांच्या सौंदर्यात अधिकच भर घालत होते.
-
मेकअप आर्टिस्ट आंचल ठक्करने रेवती यांचा लूक मिनिमल ठेवत केसांची सुंदर वेणी बांधली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : रेवती सुळे/इन्स्टाग्राम)
आवडती अभिनेत्री कोण? प्रश्न विचारताच तुकाराम मुंढे हसले आणि म्हणाले; “मी..”