-
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचा काही दिवसांपूर्वी विवाह सोहळा मुंबईत पार पडला.
-
या विवाहसोहळ्यात अनेक मान्यवर उपस्थित होते. राजकीय, सिनेसृष्टी, उद्योगजगतातील प्रतिष्ठित लोक या सोहळ्याला आले होते.
-
अत्यंत दिमाखदार पद्धतीने पार पडलेल्या या विवाह सोहळ्यात सुप्रिया सुळे यांच्या हिरव्याजर्द पैठणीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
-
याच पैठणीविषयी सुप्रिया सुळे यांनी ३५ वर्षांपूर्वीची एक आठवण शेअर केली आहे. याविषयी त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर माहिती दिली.
-
सुप्रिया सुळेंची ही साडी त्यांच्याच लग्नातील आहे. याबाबत त्या म्हणाल्या, “मुलांचं लग्न हा प्रत्येक आई-वडिलांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो. सुमारे ३५ वर्षांपूर्वी, ४ मार्च १९९१ रोजी वधू म्हणून माझ्या लग्नात नेसलेली पैठणी नवरीची आई म्हणून रेवती आणि सारंग यांच्या २० जून रोजी झालेल्या विवाहसोहळ्यात पुन्हा परिधान करण्याचा योग आला.”
-
“ही पैठणी छत्रपती संभाजीनगर येथील विणकर बशीरजी यांनी अत्यंत कौशल्याने विणलेली आहे. ती पुन्हा नेसताना अनेक आठवणी जाग्या झाल्या आणि आनंदात आणखी भर पडली”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.
-
“काही गोष्टींचं सौंदर्य काळानुसार अधिकच खुलत जातं. या पैठणीत केवळ रेशमाचे धागे नाहीत, तर आठवणी, संस्कृती आणि आपल्या कारागिरांच्या कष्टांची समृद्ध परंपरा विणलेली आहे. म्हणूनच ही साडी नेसताना मी कारागिरांच्या अविश्रांत मेहनतीप्रती कृतज्ञ आहे. काही गोष्टींचं मोल कशातही चुकविता येत नाही, हेच खरं”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
-
दरम्यान, रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचं मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर कन्वेशन सेंटरमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न झालं.
-
लखानी कुटुंब हे उद्योगविश्वातील प्रतिष्ठित कुटुंब असून रेवतीचे सासरेअरुण लखानी नुकतेच भाजपामधून विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेले आहेत.
-
अत्यंत शाही पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला.
-
या विवाह सोहळ्यातील सर्वांच्याच वेशभुषेने लक्ष वेधून घेतलं होतं.
-
सर्व फोटो – सुप्रिया सुळे/ Instagram
भारताच्या LPG आयातीच्या धोरणात मोठा बदल! आता ६७ टक्के पुरवठा अमेरिकेकडून; केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती