-
भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचे कुटुंब सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
-
नुकताच खासदार महाडिक यांच्या थोरल्या सुनबाई वैष्णवी महाडिक (Vaishnvi Mahadik) यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
-
आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत वैष्णवी महाडिक यांनी इन्स्टाग्रामवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
यंदाच्या वाढदिवसाला त्यांनी परिधान केलेल्या आकर्षक पेस्टल रंगाच्या ड्रेसने सर्वांचेच लक्ष वेधले.
-
वैष्णवी या खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र पृथ्वीराज महाडिक (Prithviraj Mahadik) यांच्या पत्नी असून, त्यांना अमरेंद्र नावाचा मुलगा आहे.
-
२०२१ मध्ये पुणे येथे वैष्णवी आणि पृथ्वीराज यांचा विवाहसोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला होता.
-
केवळ राजकीय कुटुंबातील सून एवढीच त्यांची ओळख नसून, त्या ‘कोल्हापूर सेंटर फॉर आर्ट अँड कल्चर’च्या अध्यक्षा म्हणूनही कार्यरत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : वैष्णवी महाडिक/इन्स्टाग्राम)
गॅस अॅसिडिटी कधीच होणार नाही, सकाळीच पोट झटक्यात होईल साफ; फक्त आठवड्यातून दोनदा ‘ही’ भाजी खा