-
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची लाडकी कन्या रेवती सुळे (Revati Sule) नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.
-
रेवतीने नागपूरचे प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग लखानी (Sarang Lakhani) यांच्याशी लग्नगाठ बांधली.
-
२० जून रोजी मुंबईतील ‘जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर’ येथे हा भव्य आणि शाही विवाहसोहळा संपन्न झाला.
-
सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर या लग्नसोहळ्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
विशेष म्हणजे, लेकीच्या लग्नात सुप्रिया सुळे यांनी स्वतःच्या लग्नातील ३५ वर्षांपूर्वीची पारंपरिक हिरव्या रंगाची पैठणी साडी नेसली होती.
-
हे फोटो शेअर करताना त्यांनी, “भारतीय कारागिरीच्या सौंदर्याचे मला नेहमीच कौतुक वाटते,” असे कॅप्शन दिले आहे.
-
रेवती आणि सारंग यांच्या या शाही विवाहसोहळ्याला राजकीय, व्यावसायिक आणि बॉलिवूड क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती.
-
सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात या दिमाखदार सोहळ्याची आणि सुप्रिया सुळेंच्या पैठणीची जोरदार चर्चा रंगली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुप्रिया सुळे/इन्स्टाग्राम)
उजनी धरणात उपऱ्या माशांचा धुमाकूळ; मच्छिमारांच्या मदतीने सुरू आहे भारतातील पहिली परदेशी मासे हटाव मोहीम