-
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला.
-
विधान परिषदेच्या उपसभापतीपदी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
-
या निवडीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार आणि इतर दिग्गज नेत्यांनी भाषणातून सचिन अहिर यांच्या राजकीय प्रवासाचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
-
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ मुंबईच्या राजकारणातील एक प्रभावशाली आणि आश्वासक चेहरा म्हणून सचिन अहिर यांची ओळख आहे.
-
२१ मार्च १९७२ रोजी जन्मलेल्या सचिन अहिर यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात त्यांचे मामा म्हणजेच गँगस्टर अरुण गवळी आणि मुंबईतील कामगार चळवळीच्या माध्यमातून केली होती.
-
१९९९ मध्ये त्यांनी तत्कालीन एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश करत मुख्य प्रवाहातील राजकारणात पदार्पण केले.
-
त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या काही महिने आधी, अहिर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत तत्कालीन एकसंध शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता.
-
राजकीय आणि कामगार क्षेत्रात सक्रिय असतानाच, २००० साली सचिन अहिर यांचा विवाह संगीता यांच्याशी झाला.
-
सचिन अहिर आणि संगीता अहिर यांना किरण अहिर-शाह आणि ऐश्वर्या अहिर अशा दोन मुली आहेत.
-
सचिन अहिर हे पत्नीच्या सहकार्याने ‘श्री संकल्प प्रतिष्ठान’ ही सामाजिक संस्था चालवतात, ज्या माध्यमातून मुंबईत विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात.
-
सचिन अहिर यांच्या पत्नी संगीता अहिर या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक यशस्वी आणि नामांकित चित्रपट निर्मात्या (आहेत. त्यांनी आजवर अनेक बिग बजेट चित्रपटांची निर्मिती केली आहे.
-
दरम्यान, त्यांची मोठी मुलगी किरण ही पेशाने शेफ असून तिचे लग्न झाले आहे.
-
तर त्यांची लहान मुलगी ऐश्वर्या ही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.
-
(सर्व फोटो सौजन्य : सचिन अहिर/इन्स्टाग्राम)
‘मी आयएएसमधून निवृत्त होईन, सार्वजनिक सेवेतून नाही!’, तुकाराम मुंढेंच्या विधानाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा