-
रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापिका नीता अंबानी यांना अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतात प्रतिष्ठित मानवतावादी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
-
या गौरव सोहळ्यासाठी त्यांनी अत्यंत पारंपरिक वेशभूषा करून जागतिक व्यासपीठावर भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले.
-
नीता अंबानी यांनी स्वदेशी निर्मितीची अस्सल कांजीवरम रेशमी साडी परिधान केलेली दिसत आहे.
-
या गर्द जांभळ्या रंगाच्या साडीवर आणि गुलाबी चोळीवर हाताने रेखाटलेली देखणी तंजावर चित्रकला विणण्यात आली आहे.
-
दक्षिण भारताच्या दोन अत्यंत प्राचीन कलापरंपरांचा हा एक अद्वितीय संगम या वेशभूषेतून पाहायला मिळत आहे.
-
एकेकाळी मंदिरांच्या भिंतींवर साकारली जाणारी कला आता या साडीच्या काठावर अत्यंत कुशलतेने विणण्यात आली आहे.
-
नीता अंबानी यांच्या या शालीन आणि अत्यंत डौलदार भारतीय पेहरावाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: मनीष मल्होत्रा/इन्स्टाग्राम)
इंजिनिअरिंग करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! देशभरातील ५८ महाविद्यालये बंद; यादीत महाराष्ट्र टॉपवर, प्रवेशित विद्यार्थ्यांचे काय होणार?