-
प्रसिद्ध बॉलिवूड निर्माते बोनी कपूर यांची मुलगी अंशुला कपूर ६ जुलै रोजी तिचा होणारा पती रोहन ठक्करबरोबर लग्नगाठ बांधणार आहे.
-
अंशुला कपूरच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असून तिने नुकतेच तिच्या चुडा आणि कलिरे कार्यक्रमाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
या खास सोहळ्यात अंशुलाने फिकट हिरव्या रंगाचा पारंपारिक पंजाबी सूट परिधान केला असून गळ्यात सुंदर चोकर आणि केसांची वेणी घातलेला तिचा लूक अतिशय देखणा दिसत आहे.
-
या कौटुंबिक सोहळ्याच्या फोटोमध्ये अंशुला कपूरसोबत तिचे वडील बोनी कपूर, भाऊ अर्जुन कपूर, बहीण खुशी कपूर, जान्हवी आणि शनाया कपूर एकत्र आनंदाने हसताना दिसत आहेत.
-
अंशुला कपूर शनाया कपूरच्या डोक्यावर आनंदाने कलिरे हलवताना दिसत आहे.
-
अंशुला कपूर खुशी कपूरच्या डोक्यावर कलिरे पाडण्याची विधी करत आहे.
-
आनंदाच्या मूडमध्ये असलेल्या एका सुंदर फोटोमध्ये अंशुला कपूर कॅमेऱ्यासमोर मनमोकळी पोझ देताना आणि तिची सुंदर अंगठी दाखवताना दिसत आहे.
-
पारंपारिक विधी पार पाडतानाच्या फोटोमध्ये अंशुला कपूरच्या हातात पूजेचे गुलाब असून समोर आरतीचे तबक धरलेले दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: अंशुला कपूर/इन्स्टाग्राम)
अस्वस्थ तरुण संसदेच्या दारात! हजारोंच्या संख्येपुढे सुरक्षादले हतबल; अश्रुधुराचा माराही निष्प्रभ