-
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या कन्या रेवती सुळे (Revati Sule) आणि सारंग लखानी (Sarang Lakhani) यांचा विवाह सोहळा नुकताच २० जून रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला.
-
या विवाहानंतर काल (५ जुलै) पुण्यात त्यांच्या खास रिसेप्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
-
या शाही सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती.
-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या कौटुंबिक सोहळ्याचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
रिसेप्शन सोहळ्यासाठी रेवती सुळे यांनी पिवळ्या रंगाची अत्यंत सुंदर पैठणी साडी नेसली होती, तर सारंग लखानी हे पांढऱ्या रंगाच्या कुर्ता-सूटमध्ये दिसून आले.
-
सुप्रिया सुळे यांचे जावई सारंग लखानी हे नागपूरचे प्रसिद्ध उद्योगपती अरुण लखानी (Arun Lakhani) यांचे सुपुत्र आहेत.
-
सध्या या दिमाखदार रिसेप्शन सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडून नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुप्रिया सुळे/इन्स्टाग्राम)
“मंगेशकर कुटुंबीय कोणाला काही देत नाहीत; पण मला…” भाजपच्या नेत्याने सांगितला अनुभव!