-
खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची कन्या रेवती सुळे (Revati Sule) आणि सारंग लखानी (Sarang Lakhani) यांचा विवाहसोहळ्यानंतरचा जंगी रिसेप्शन सोहळा काल (५ जुलै) पुण्यात उत्साहात पार पडला.
-
पुण्यातील ‘पंडित फार्म्स’ येथे आयोजित या सोहळ्याला विविध राजकीय पक्षांतील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती.
-
पिवळ्या रंगाच्या पारंपरिक पैठणीत नववधू रेवतीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते.
-
रेवती सुळे आणि सारंग लखानी यांनी २० जून रोजी मुंबईत अत्यंत थाटामाटात लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर काल पुण्यात त्यांच्या विशेष रिसेप्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
-
या सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
-
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून नववधू-वरास शुभाशीर्वाद दिले.
-
याप्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूसही केली.
-
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनीही या सोहळ्याला हजेरी लावत नवदाम्पत्याचे अभिनंदन केले.
-
“त्यांचे वैवाहिक जीवन सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि यशाने परिपूर्ण होवो, हीच सदिच्छा,” अशा भावना मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त केल्या.
-
याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, माजी आमदार यशवंत माने यांच्यासह अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुप्रिया सुळे/इन्स्टाग्राम)
मुंबई – पुणे मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला; डोंगरावरील पावसाचे पाणी थेट मिसिंग लिंकवर