-
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) सध्या त्यांच्या एका खास लूकमुळे सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेत आहेत.
-
५ जुलै रोजी सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे (Revati Sule) आणि सारंग लखानी (Sarang Lakhani) यांचा रिसेप्शन विवाह सोहळा पुण्यात पार पडला.
-
या सोहळ्यातील सुप्रिया सुळेंच्या पारंपारिक लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
-
लेकीच्या या विशेष दिनासाठी सुप्रिया सुळे यांनी निळ्या रंगाची सुंदर बनारसी साडी नेसली होती.
-
या साडीवर सुप्रिया सुळे यांनी पारंपरिक सोन्याच्या दागिन्यांचा साज केला होता. त्यांचा हा साधेपणा आणि त्यातली भव्यता नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.
-
२० जून रोजी मुंबईत रेवती आणि सारंग यांचा विवाहसोहळा संपन्न झाला होता.
-
त्यानंतर पुण्यात आयोजित या रिसेप्शन सोहळ्याला विविध क्षेत्रांतील दिग्गजांसह अनेक प्रमुख राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती.
-
सध्या नवदाम्पत्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुप्रिया सुळे/इन्स्टाग्राम)
Video: गौरव मोरेच्या नव्या घरी पोहोचले जॉनी लिव्हर; गौरवची ‘ती’ कृती पाहून नेटकरी म्हणाले, “जिंकलंस भावा”