-
क्रिकेटचा ‘देव’ मानला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) ५ मार्च रोजी विवाहबंधनात अडकला.
-
अर्जुनने त्याची दीर्घकाळाची मैत्रीण आणि व्यावसायिक सानिया चंडोकबरोबर (Saaniya Chandhok) मुंबईत एका शाही सोहळ्यात सात फेरे घेतले.
-
लग्न होऊन काही दिवस उलटले असले, तरी या ग्रँड वेडिंगची चर्चा अजूनही सोशल मीडियावर रंगताना दिसत आहे.
-
आता अर्जुनची पत्नी सानिया तेंडुलकरने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर लग्नाचे काही खास आणि कधीही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत.
-
हे सुंदर फोटो शेअर करताना सानियाने कॅप्शनमध्ये लिहिले, “अजूनही त्या लग्नातील प्रत्येक क्षण मी पुन्हा पुन्हा जगत आहे…”
-
लग्नासाठी अर्जुनने लाल रंगाचा डिझायनर कुर्ता परिधान केला होता, तर नववधू सानिया लाल रंगाच्या भरजरी साडीत अत्यंत खुलून दिसत होती.
-
या दोघांचा रॉयल लूक चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडत आहे.
-
या भव्य विवाहसोहळ्याला क्रिकेट जगतातील दिग्गज, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि नामांकित उद्योगपतींनी हजेरी लावली होती.
-
सानियाने शेअर केलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडून आणि चाहत्यांकडून या नवविवाहित जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सानिया चंडोक/इन्स्टाग्राम)
‘झुंजुर-मुंजुर पाऊस माऱ्यानं’, गाण्यावर तरूणींनी धरला ठेका; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अंगभर पेहराव करून…”