-
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नुकतेच पंढरपुरात श्री विठ्ठल-रखुमाईचे मनोभावे दर्शन घेतले.
-
याप्रसंगी त्यांनी राज्यात सर्वदूर चांगला पाऊस पडू दे, बळीराजा सुखी-समाधानी राहू दे आणि राज्यावरील सर्व संकटे दूर होऊ दे, असे साकडे विठुरायाच्या चरणी घातले.
-
तसेच यंदाची आषाढी वारी प्रत्येक वारकऱ्यासाठी सुरक्षित आणि सुखकर ठरावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.
-
“वारकऱ्यांच्या सेवेसाठी राज्य शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे,” अशी ग्वाही देत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, आषाढी वारीदरम्यान भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
-
याशिवाय, पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल ₹४,००० कोटींच्या विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली.
-
पंढरपूर दौऱ्यादरम्यान त्यांनी मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या नूतन धर्मशाळा इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पाडला.
-
या सोहळ्यानंतर त्यांनी वारकरी बांधवांसोबत सहभोजनाचा आस्वाद घेतला आणि पुन्हा एकदा विठ्ठल चरणी राज्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुनेत्रा पवार/इन्स्टाग्राम)
वर्क फ्रॉम होम न देणाऱ्या खासगी कंपन्यांना देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन, “मानवतेच्या दृष्टिकोनातून निर्णय घ्या”