-
भारतीय जनता पक्षाचे (BJP) राज्यसभा खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या थोरल्या सून वैष्णवी महाडिक (Vaishnavi Mahadik) सध्या आपल्या खास लूकमुळे सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेत आहेत.
-
वैष्णवी महाडिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत प्रसिद्ध फोटोग्राफर बबलू शेरेकर यांनी त्यांच्या एका विशेष फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये वैष्णवी यांनी परिधान केलेली केशरी रंगाची मुनिया पैठणी आणि त्यांचा पारंपरिक लूक नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
या पारंपरिक लूकला परिपूर्ण करण्यासाठी वैष्णवी यांनी मोजकेच पण अत्यंत सुबक दागिने परिधान केले आहेत.
-
हातात फुल घेऊन त्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या पोज फोटोंचे सौंदर्य अधिकच वाढवत आहेत.
-
वाढदिवसाच्या मुख्य सोहळ्यासाठी वैष्णवी यांनी पेस्टल रंगाचा एक सुंदर ड्रेस परिधान केला होता, ज्यातील त्यांच्या स्टाईलचीही प्रचंड प्रशंसा होत आहे.
-
वैष्णवी महाडिक या खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र पृथ्वीराज महाडिक यांच्या पत्नी असून, त्यांना अमरेंद्र नावाचा मुलगा आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : वैष्णवी महाडिक/इन्स्टाग्राम)
अण्णा हजारेंबाबत प्रश्न विचारताच अभिजित दीपकेचं उत्तर; “म्हाताऱ्या माणसांनी निवृत्त होऊन आश्रमात बसावं”