-
अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे त्यांनी केलेल्या बेधडक कारवाया आणि कामामुळे सतत होणाऱ्या बदल्यांमुळे ते नेहमीच चर्चेत असतात.
-
प्रशासकीय सेवेतील आपल्या कडक आणि शिस्तप्रिय कार्यपद्धतीमुळे ओळखले जाणारे तुकाराम मुंढे हे नेहमीच जनमानसात चर्चेचा विषय ठरतात.
-
आता मात्र ते कोणत्याही शासकीय कारवायांमुळे नव्हे, तर चक्क त्यांच्या वैयक्तिक आयुष्य आणि कौटुंबिक गोष्टींमुळे सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत. (फोटो सौजन्य: संग्रहित)
-
न्यूज १८ मराठी या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्य आणि वैवाहिक प्रवासाबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले होते.
-
त्यांच्या वैवाहिक आयुष्याचा वेध घेताना, तुम्ही तुमच्या पत्नीच्या प्रेमात नेमके कधी पडलात, असा एक थेट आणि रंजक प्रश्न त्यांना या मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला.
-
त्यावर नेहमीच गंभीर दिसणाऱ्या वरिष्ठ तुकाराम मुंढेंनी अतिशय मनमोकळेपणाने आणि हसतमुख चेहऱ्याने या प्रश्नाचे उत्तर दिले.
-
उत्तर देताना ते म्हणाले, “पहिल्या नजरेत प्रेम असे काही नव्हते; परंतु जसे आम्ही संवाद साधत गेलो आणि आमचे विचार जुळत गेले तसे आमच्यात प्रेम वाढत गेले. जरी आमचे विचार खूप वेगळे असले, नाही असे नाही विचार वेगळे आहेत पण ज्या पद्धतीने तिने घराची दुसरी बाजू सांभाळली आहे, ती खऱ्या अर्थाने अर्धांगिनी म्हणून वाखाणण्याजोगी आहे.”
-
(Photo: Facebook Tukaram Mundhe)
एल निनोचा प्रभाव असूनही मुंबईत रेकॉर्ड ब्रेक पाऊस का पडतोय?