-
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर नुकताच ५ मार्च रोजी विवाहबंधनात अडकला.
-
अर्जुनचा त्याची मैत्रीण व व्यावसायिक सानिया चंडोकसोबत मुंबईत अत्यंत थाटामाटात विवाहसोहळा पार पडला.
-
या भव्य लग्नसोहळ्याची धामधूम संपली असली तरी सोशल मीडियावर त्याची अजूनही चर्चा सुरूच आहे.
-
आता अर्जुनची पत्नी सानिया तेंडुलकरने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून लग्नाचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
याआधी कधीही न पाहिलेले हे इनसाइड फोटो चाहत्यांसाठी एक मोठी पर्वणी ठरत आहेत.
-
फोटो पोस्ट करीत सानियाने लिहिले आहे की, सोशल मीडियावर पोस्ट करायला थोडा उशीर झाला; पण हे माझ्या आयुष्यातील काही अत्यंत आवडते क्षण आहेत.
-
एका वेस्टर्न लूकमध्ये सानियाने लाल रंगाचा सुंदर गाऊन परिधान केला असून, अर्जुनही देखणा दिसत आहे.
-
सानियाने शेअर केलेल्या या फोटोंवर अवघ्या काही तासांतच चाहत्यांकडून लाfक्स आणि शुभेच्छांचा मोठा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: सानिया चंडोक/इन्स्टाग्राम)
आई गं, काय नाचल्या…. ‘कोयल से तेरी बोली’ गाण्यावर पोरींचा धिंगाणा; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक