-
वडील उद्धव ठाकरे आणि भाऊ आदित्य ठाकरे राजकारणात सक्रिय असताना, राजकारणापासून नेहमी दूर राहणाऱ्या तेजस ठाकरेंनी वनस्पतीची नवीन प्रजाती शोधून काढली आहे.
-
तेजस ठाकरे यांना वन्यजीव, निसर्ग आणि पर्यावरण क्षेत्रात विशेष रुची असून त्यांनी यापूर्वीही अनेक दुर्मीळ प्रजाती शोधून काढल्या आहेत.
-
त्यांचा हा नवा शोध अरुणाचल प्रदेशातील सुबानसिरी खोऱ्यातील अत्यंत दुर्गम अशा घनदाट जंगलात लागला आहे.
-
या शोधमोहिमेदरम्यान त्यांना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा एका लहान झाडाची नवीन प्रजाती आढळून आली.
-
ही नवीन प्रजाती अत्यंत आकर्षक फुले येणाऱ्या ‘कस्टर्ड ॲपल’ म्हणजेच सीताफळ (Annonaceae) कुळातील ‘मिट्रेफोरा’ (Mitrephora) या वर्गातील आहे. (फोटो सौजन्य : ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन/इन्स्टाग्राम)
-
या वनस्पतीचे नामकरण तेजस ठाकरे यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे यांच्या सन्मानार्थ ‘मिट्रेफोरा रश्मिया’ (Mitrephora rashmiae) असे करण्यात आले आहे. (फोटो सौजन्य : ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन/इन्स्टाग्राम)
-
रश्मी ठाकरे यांनी तेजस यांच्यातील बालपणीची निसर्गाविषयीची उत्सुकता जोपासली आणि त्यांच्यातील वर्गीकरण शास्त्राची आवड वाढवण्यास मदत केली.
-
ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या स्थापनेत आणि त्याच्या वाढीमध्ये रश्मी ठाकरे यांनी दिलेल्या बहुमूल्य पाठिंब्यासाठी ही प्रजाती त्यांना समर्पित करण्यात आली आहे.
-
सध्याच्या माहितीनुसार या अत्यंत दुर्मीळ प्रजातीचे अवघे एकच झाड अस्तित्वात असल्याचे समोर आले आहे.
-
पूर्व हिमालयीन जैवविविधता हॉटस्पॉट क्षेत्रात नोंदवली गेलेली मिट्रेफोरा वर्गातील ही केवळ दुसरीच प्रजाती ठरली आहे.
-
ही वनस्पती तिच्या फुलांच्या वेगळ्या रचनेसाठी आणि एकाच झाडावर नर आणि उभयलिंगी अशी दोन्ही प्रकारची फुले येणाऱ्या या वर्गातील एकमेव प्रजाती असल्यामुळे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठरते. (सर्व फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
रमेश म्हात्रेच्या भेटीसाठी डोंबिवलीतील समर्थक गोव्यात; अंजुनी रिसाॅर्टवर भेटण्यासाठी व्यावसायिक वाहनांची सोय