-
Parth Pawar Kainat Dhar Engagement: पवार कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण असून, लवकरच घरात पुन्हा एकदा सनई-चौघडे वाजणार आहेत.
-
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि राज्यसभा खासदार पार्थ पवार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
-
पार्थ पवार यांचा साखरपुडा कायनात धार यांच्याशी होणार असून, २९ जुलै रोजी पुण्यात हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
-
काही दिवसांपूर्वीच पार्थ पवार आणि कायनात धार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या विवाहसोहळ्यात एकत्र हजेरी लावली होती, तेव्हापासूनच या चर्चांना उधाण आले होते.
-
कायनात धार या मूळच्या काश्मीरच्या रहिवासी आहेत.
-
कायनात धार यांनी आपले शिक्षण आणि करिअरची सुरुवात दिल्लीतून केली आहे.
-
कायनात या पवार कुटुंबाच्या अत्यंत जवळच्या मानल्या जातात, तसेच त्या पार्थ पवार यांच्या चांगल्या मैत्रिणही आहेत.
-
दरम्यान, पार्थ पवार सध्या राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : पार्थ पवार/इन्स्टाग्राम)
आश्वासनांचे गाजर अन् रस्त्याऐवजी खड्डे; सोलापूर महापालिका, ठेकेदाराच्या विरोधात खासदार प्रणिती शिंदे केले ठिय्या आंदोलन