-
Parth Pawar Kaiynaat Dhar Engagement Card: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते पार्थ पवार यांचा बुधवार, २९ जुलै रोजी साखरपुडा पार पडणार आहे.
-
आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पार्थ पवार यांच्या साखरपुड्याची निमंत्रण पत्रिका शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे.
-
पार्थ आणि कायनात यांना शुभेच्छा देताना रोहित पवार म्हणाले, “प्रेमाच्या रेशीमगाठीत अडकून नवी इनिंग सुरू करणारे माझे प्रिय बंधू पार्थ आणि कायनात, या दोघांनाही साखरपुड्याच्या मनापासून शुभेच्छा!”
-
“तुमचा पुढील प्रवास आनंदाचा, सुखाचा आणि समृद्धीचा होवो; तसेच तुमच्या दोघांचे हे प्रेमाचे नाते उत्तरोत्तर बहरत जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!” असेही रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
-
पार्थ पवार यांचा साखरपुडा काश्मीरच्या रहिवासी असलेल्या कायनात धार यांच्याशी होणार आहे.
-
कायनात धार यांनी आपले शिक्षण आणि करिअरची सुरुवात दिल्लीतून केली आहे.
-
काही दिवसांपूर्वीच पार्थ पवार आणि कायनात धार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या विवाहसोहळ्यात एकत्र हजेरी लावली होती, तेव्हापासूनच या लग्नबंधनाची चर्चा सुरू झाली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : रोहित पवार आणि पार्थ पवार/इन्स्टाग्राम)
रमेश म्हात्रेच्या भेटीसाठी डोंबिवलीतील समर्थक गोव्यात; अंजुनी रिसाॅर्टवर भेटण्यासाठी व्यावसायिक वाहनांची सोय