-
राज्याचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे सध्या एका विशेष कारणामुळे प्रचंड चर्चेत आले असून त्यांच्या एका विधानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
आषाढी वारीमध्ये सध्या एका अतिशय वेगळ्याच गोष्टीने वारीत सहभागी झालेल्या सर्व भाविकांचे आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेतले असल्याचे पाहायला मिळत आहे.
-
या पवित्र आषाढी वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांच्या हातामध्ये राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांचे छायाचित्र असलेले फलक पाहायला मिळत आहेत.
-
या फलकांवर “जनतेची सेवा हीच खरी ईश्वर पूजा” अशा प्रकारचे संदेश लिहिण्यात आले होते.
-
वारीतील या संपूर्ण प्रकारावर आणि वारकऱ्यांच्या हातातील फलकांवर आता स्वतः आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
-
तुकाराम मुंढे यांनी मुंबई तक या वृत्तवाहिनीच्या चॅनेलला दिलेल्या एका विशेष मुलाखतीदरम्यान या सर्व विषयावर सविस्तर भाष्य केले.
-
ते म्हणाले, लोकांचं प्रेम भरपूर आहे, त्यासाठी मी त्यांचा कृतज्ञ राहीन, कतृज्ञ आहे. परंतु, माझं एवढंच म्हणण आहे, आपण कोणालाही देव बनवू नका, कोणालाही दानव बनवू नका; यांच्या मध्ये माणूस आहे म्हणून माणूस म्हणून जगूया.
-
पुढे ते म्हणाले, मी हीरो आहे असं मला वाटत नाही, सोशल मीडियावरती काय गोष्टी येतात हे कोणाच्या कंट्रोलचा विषय नाही. कधी कधी बरं वाटतं, पण त्याचबरोबर जबाबदारी वाढलेली आहे हे जाणवतं. तेवढ्याच जबाबदारीने काम करण्याचा मी प्रयत्न करतो.
-
(Photo: Facebook Tukaram Mundhe)
‘सुरुवातीच्या काळात अशा प्रकारच्या गाजावाजाची गरजच…’, तुकाराम मुंढेंबद्दल BMC आयुक्त अश्विनी भिडे काय म्हणाल्या?