-
शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली आई प्रतिभा पवार यांच्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
-
राजकीय मतभेद कितीही असले तरी ठाकरे आणि सुळे-पवार कुटुंबातील कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध नेहमीच दृढ राहिले आहेत.
-
सुप्रिया सुळे यांनी या खास कौटुंबिक भेटीचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या भेटीदरम्यान दोन्ही कुटुंबांतील महिला सदस्यांमध्ये अत्यंत आपुलकीचे आणि हास्याचे क्षण पाहायला मिळाले.
-
या छायाचित्रात राज ठाकरे यांच्या आई कुंदा ठाकरे आणि पत्नी शर्मिला ठाकरे देखील दिसत आहेत.
-
शिवतीर्थ बंगल्याच्या बाल्कनीमध्ये अगदी मोकळ्या आणि हसऱ्या वातावरणात त्या मनमोकळा संवाद साधताना या फोटोंमधून दिसत आहेत.
-
या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत सुप्रिया सुळे यांनी ‘ठाकरे कुटुंबाला भेटण्यासाठी आईसोबत काढलेली एक सुंदर वेळ; आपुलकी, निखळ हास्य आणि गोड आठवणींनी समृद्ध झालेली एक प्रसन्न सकाळ!’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
ठाकरे आणि पवार कुटुंबातील जुने कौटुंबिक स्नेहबंध आजही तितकेच घट्ट असल्याचे यावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
-
(सर्व फोटो सौजन्य: सुप्रिया सुळे/इन्स्टाग्राम)
गॅस अॅसिडिटी कधीच होणार नाही, सकाळीच पोट झटक्यात होईल साफ; फक्त आठवड्यातून दोनदा ‘ही’ भाजी खा