-
अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्नपदार्थांमधील भेसळ आणि हॉटेल्समधील अस्वच्छतेविरोधात जोरदार कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे सध्या राज्यभरात त्यांच्या नावाची मोठी चर्चा आहे.
-
एक कर्तव्यदक्ष आणि धडक निर्णय घेणारे अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांची ओळख आहे.
-
आपल्या याच कडक स्वभावामुळे त्यांची आतापर्यंत अनेकदा बदली झाली आहे. ते एक कठोर, शिस्तप्रिय आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात.
-
नुकतीच तुकाराम मुंढे यांनी ‘मुंबई तक’ला एक विशेष मुलाखत दिली.
-
या मुलाखतीदरम्यान त्यांना, “तुम्ही कधी हॉटेलमध्ये जेवायला जाता का? किंवा बाहेरचे पदार्थ खाता का?” असे प्रश्न विचारण्यात आले होते.
-
यावर उत्तर देताना तुकाराम मुंढे म्हणाले, “मी आतापर्यंत अत्यंत कमी वेळा बाहेर खाल्ले आहे. मला बाहेरचे कोणतेही पदार्थ खायला आवडत नाही.”
-
त्यांच्यासाठी सर्वात उत्तम आणि आवडीचे जेवण म्हणजे ‘घरचे जेवण’ आहे. “अन्न शरीरासाठी (आरोग्यासाठी) खायचे की फक्त चवीसाठी (टेस्टसाठी), हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
-
“नियामक (संस्था) आणि उद्योजक हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ग्राहकांना आणि नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ देणे तसेच सुरक्षित औषधे पुरवणे हे दोघांचेही कर्तव्य आहे. नागरिक, उत्पादक आणि नियामक हे सगळे एकाच व्यवस्थेचा भाग असून ते एकमेकांचे विरोधक नाहीत,” असा संदेश तुकाराम मुंढे यांनी नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत दिला.
-
(सर्व फोटो सौजन्य : तुकाराम मुंढे/इन्स्टाग्राम)
‘कंपनीला कुटुंब मानण्याची चूक करू नका’, दोन वर्षांच्या मुलासह लॅपटॉप द्यायला गेलेल्या कर्मचाऱ्याला मिळाला धडा