-
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा पवार यांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले.
-
ऋतुजा पवार यांनी ‘राम कृष्ण हरी’ असे कॅप्शन देत सोशल मीडियावर आषाढी वारीतील दर्शनाचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
आषाढी वारीनिमित्त जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे देहू नगरीतून मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले.
-
या पालखीचा मुक्काम आकुर्डी, पुणे, यवत, वरवंड आणि बारामती येथे होतो.
-
संत तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
-
दर्शन सोहळ्यानंतर ‘ज्ञानबा-तुकाराम’ आणि हरिनामाच्या गजरात पालखीने पुढील मुक्कामासाठी प्रवास सुरू केला.
-
अजित पवार यंदाच्या सोहळ्यात उपस्थित नसल्याची सल बारामतीकरांच्या मनात आहे, त्यामुळे पालखी सोहळ्यातील वातावरण काहीसे भावुक झाले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऋतुजा पवार/इन्स्टाग्राम)
‘सुरुवातीच्या काळात अशा प्रकारच्या गाजावाजाची गरजच…’, तुकाराम मुंढेंबद्दल BMC आयुक्त अश्विनी भिडे काय म्हणाल्या?