-
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार पार्थ पवार (Parth Pawar) यांचा कायनात दारा (Kaiynaat Dara) यांच्यासह २९ जुलै रोजी दिमाखदार साखरपुडा पार पडला.
-
पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अत्यंत कौटुंबिक वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.
-
या सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ आणि प्रमुख नेत्यांनी आवर्जून हजेरी लावली होती.
-
सध्या सोशल मीडियावर पार्थ पवारांचे भाऊ जय पवार (Jay Pawar) यांच्या पत्नी ऋतुजा पवार (Rutuja Pawar) यांच्या लूकची जोरदार चर्चा सुरू आहे.
-
या सोहळ्यासाठी ऋतुजा पवार यांनी पांढऱ्या रंगाची अत्यंत सुंदर डिझायनर साडी नेसली होती.
-
पांढऱ्या साडीतील या लूकवर त्यांनी परिधान केलेल्या हिऱ्यांच्या दागिन्यांनी त्यांच्या सौंदर्यात अधिकच भर घातली होती.
-
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा विवाहसोहळा २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे पार पडणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऋतुजा पवार/इन्स्टाग्राम)
आई, गं… याला बोलतात खरा डान्स…. “अधीर मन झाले” गाण्यावर तरूणीचा नादखुळा डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक