-
Parth Pawar Kaiynaat Dara Engagement Ceremony: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा साखरपुडा २९ जुलै २०२६ रोजी पुण्यात पारंपरिक वातावरणात पार पडला.
-
पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा साखरपुडा येरवडा येथील द रिट्झ-कार्लटन हॉटेलमध्ये पार पडला.
-
या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांनी उपस्थिती लावली.
-
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रतापराव पवार, राजेंद्र पवार, सुनंदा पवार, सई पवार आणि रेवती सुळे यांसह पवार कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून जोडप्याला आशीर्वाद दिले.
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सोहळ्याला हजेरी लावून पार्थ व कायनात यांना आशीर्वाद दिले.
-
आमदार दिलीप वळसे पाटील यांनी सहकुटुंब उपस्थित राहून पार्थ पवार आणि कायनात दारा यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
-
हा सोहळा अत्यंत खासगी स्वरूपाचा असून मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.
-
या प्रसंगी दोन्ही राष्ट्रवादी गटातील तसेच महायुतीतील प्रमुख नेते एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.
-
साखरपुड्यानंतर आता पार्थ पवार आणि कायनात दारा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : पार्थ पवार/इन्स्टाग्राम)
महिलांनो, फ्रिजमध्ये A4 आकाराचा कागद ठेवून पाहा; मोठ्या समस्येवर उपाय, बाहेर काढल्यानंतर दिसेल कमाल, एकदा हा जुगाड करुन पाहाच