-
Parth Pawar and Kayinaat Dara Engagement: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा २९ जुलै रोजी पुण्यात दिमाखदार साखरपुडा सोहळा पार पडला.
-
या आनंददायी प्रसंगी पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आले असून अनेक दिग्गज नेत्यांनीही सोहळ्याला उपस्थिती लावली होती.
-
साखरपुड्याच्या या खास कार्यक्रमासाठी पार्थ पवार यांच्या होणाऱ्या पत्नी कायनात दारा यांनी दोन अत्यंत आकर्षक लूक केले होते.
-
त्यांचा डिझायनर पेस्टल आकाशी रंगाच्या नक्षीदार साडीतील मोहक लूक सध्या सर्वत्र खूप चर्चेत आहे.
-
तसेच कायनात यांच्या पिवळ्या रंगाच्या पारंपरिक साडीतील सुंदर लूकचीही विशेष चर्चा पाहायला मिळत आहे.
-
पिवळ्या रंगाच्या साडीवर नाजूक मोत्यांचे दागिने घालून केस मोकळे सोडत त्यांनी आपला हा लूूक पूर्ण केला होता.
-
पार्थ पवार यांची होणारी पत्नी कायनात दारा या मूळच्या चंदीगड (पंजाब) येथील रहिवासी आहेत.
-
सध्या पार्थ पवार आणि कायनात दारा यांच्या साखरपुड्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: पार्थ पवार/इन्स्टाग्राम)
महिलांनो, फ्रिजमध्ये A4 आकाराचा कागद ठेवून पाहा; मोठ्या समस्येवर उपाय, बाहेर काढल्यानंतर दिसेल कमाल, एकदा हा जुगाड करुन पाहाच