-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार (Sunetra Ajit Pawar) यांचे सुपुत्र खासदार पार्थ पवार (Parth Pawar) यांचा २९ जुलै रोजी साखरपुडा पार पडला.
-
पार्थ पवार आणि कायनात दारा (Kaiynaat Dara) यांचा साखरपुडा सोहळा पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये संपन्न झाला.
-
सध्या सोशल मीडियावर या सोहळ्यातील सुनेत्रा पवार यांच्या खास लूकची जोरदार चर्चा रंगली आहे.
-
या शुभप्रसंगी सुनेत्रा पवार यांनी पांढऱ्या रंगाची अत्यंत सुंदर आणि पारंपारिक मुनिया पैठणी नेसली होती.
-
या सोहळ्यात पार्थ पवार यांनी क्रीम रंगाची शेरवानी, तर कायनात दारा यांनी पेस्टल निळ्या रंगाची नक्षीदार डिझायनर साडी नेसली होती.
-
पार्थ पवार आणि कायनात यांच्या साखरपुड्याला राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी आवर्जून हजेरी लावली.
-
या सोहळ्याला शरद पवार, सुप्रिया सुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुनेत्रा पवार/इन्स्टाग्राम)
Video: अभिजीत दिपकेंची PM मोदींच्या शिक्षणावर खोचक टिप्पणी! म्हणाले, “जर ‘pawpaw’नी त्यांची डिग्री दाखवली तर, मी उद्याच…”