-
भारतीय जनता पार्टीचे (BJP) राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांची थोरली सून आणि पृथ्वीराज महाडिक यांच्या पत्नी वैष्णवी महाडिक या आपल्या सोशल मीडिया पोस्ट्समुळे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असतात.
-
त्यांनी अलीकडेच शेअर केलेल्या काही फोटोंमध्ये त्यांचा पारंपरिक थाट पाहायला मिळत आहे, जे प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
या फोटोशूटमध्ये वैष्णवी यांनी परिधान केलेली अबोली रंगाची जाळीदार साडी खूपच आकर्षक दिसत आहे, ज्यावर नाजूक फुलांचे भरतकाम आहे.
-
त्यांनी गळ्यात हिऱ्याचा हार आणि हिरव्या रंगाच्या कुंदन वर्कचे कानातले घातले आहेत, जे या लूकवर परफेक्ट ठरत आहेत.
-
अर्धे केस मागे बांधून आणि उरलेले केस मोकळे ठेवून, त्यांनी केलेली हेअरस्टाईल त्यांच्या चेहऱ्याला शोभा देत आहे.
-
वैष्णवी यांचे हे फोटो एखाद्या बागेत काढलेले असून, हिरवळ आणि फुलांच्या पार्श्वभूमीमुळे त्यांचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत आहे.
-
या नव्या फोटोंमध्ये त्यांचा राजेशाही थाट आणि पारंपरिक सौंदर्य स्पष्टपणे दिसून येत आहे.
-
वैष्णवी यांच्या या फोटोंवर सोशल मीडियावर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा मोठा वर्षाव होत आहे.
-
कोल्हापूरमधील महाडिक कुटुंबातील थोरल्या सूनबाईंच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर खूपच चर्चा होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: वैष्णवी महाडिक/इन्स्टाग्राम)
पोटातली सगळी घाण झटक्यात बाहेर पडेल; झोपण्याआधी फक्त ‘हे’ एक पान चावून खा; आतड्यांत सडणारी घाण होईल साफ