-
भाजपा खासदार धनंजय महाडिक यांचे नातू तसेच पृथ्वीराज महाडिक व वैष्णवी महाडिक यांचे सुपुत्र अमरेंद्र यांचा आज चौथा वाढदिवस आहे.
-
अमरेंद्र यांच्या चौथ्या वाढदिवसाचे खास फोटो वैष्णवी महाडिक यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
तीन मजली केक आणि प्राण्यांच्या थीमसह अमरेंद्रचा वाढदिवस अत्यंत थाटामाटात साजरा करण्यात आला.
-
वाढदिवसाच्या दिवशी अमरेंद्रने पांढरा टी-शर्ट आणि त्यावर मेंदी रंगाचे जॅकेट परिधान केले असून तो खूपच क्यूट दिसत आहे.
-
या खास प्रसंगी वैष्णवी महाडिक यांनी अबोली रंगाची सुंदर जाळीदार साडी नेसली होती.
-
केक कापताना अमरेंद्र याने आई वैष्णवी यांच्या गालावर किस करतानाचा एक अत्यंत गोड फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
-
हे फोटो शेअर करत त्यांनी ‘My little cub just turned 4’ अशी प्रेमळ कॅप्शन दिली आहे.
-
वैष्णवी यांनी शेअर केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून अमरेंद्रवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: वैष्णवी महाडिक/इन्स्टाग्राम)
आई गं, काय नाचल्या…. ‘कोयल से तेरी बोली’ गाण्यावर पोरींचा धिंगाणा; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक