-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) सध्या पत्नी सोनाली जाधव (Sonali Jadhav) यांच्याबरोबर स्वित्झर्लंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.
-
स्वित्झर्लंड (Switzerland) हा मध्य युरोपमधील अत्यंत सुंदर आणि निसर्गरम्य देश आहे.
-
उंचच उंच बर्फाच्छादित आल्प्स पर्वतरांगा, स्वच्छ निळ्या पाण्याचे तलाव, हिरवीगार मैदाने आणि नयनरम्य दृश्यांसाठी हा देश जगभरात प्रसिद्ध आहे.
-
राजकारणातील आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून अविनाश जाधव यांनी ही खास ट्रिप प्लॅन केली आहे.
-
अविनाश यांच्या पत्नी सोनाली यांनी सोशल मीडियावर स्वित्झर्लंडमधील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
हे फोटो शेअर करताना त्यांनी, “प्रत्येक प्रेमकथा सुंदर असते, पण आपली प्रेमकथा माझी सर्वात आवडती आहे” असे रोमँटिक कॅप्शन दिले आहे.
-
अविनाश आणि सोनाली यांच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली असून, “खूप छान दादा-वहिनी”, “कौटुंबिक ब्रेकही आवश्यक आहे दादा”, “लय भारी” अशा अनेक कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अविनाश जाधव/इन्स्टाग्राम)
पोटात वाढलेली आठ किलो वजनी गाठ काढण्यात यश; ठाणे पालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाद्वारे शस्त्रक्रिया