-
पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव तथा डॉ. डी. वाय. पाटील यांचे वयाच्या ९० व्या वर्षी मंगळवारी निधन झाले.
-
ते ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी तसेच बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल होते. शिक्षणसम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डी. वाय. पाटील यांना १९९१ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
-
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर त्यांची नात राजलक्ष्मी पाटील यांनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
-
भावूक पोस्ट शेअर करत त्यांनी लहानपणीचा डॉ. पाटील यांच्यासोबतचा एक फोटोही पोस्ट केला आहे.
-
फोटो पोस्ट करीत त्यांनी, ‘माझे लाडके आजोबा, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाची बातमी देताना मला अत्यंत दुःख होत आहे. तुम्ही आमचे जिवंत देव होतात आणि कायम राहाल. दादा, आम्ही तुमची खूप आठवण काढू’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
राजलक्ष्मी यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी कमेंट्स करीत डॉ. डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
-
राजलक्ष्मी या ‘डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी’च्या मॅनेजिंग ट्रस्टी असून, ‘डी वाय क्लायमेट ॲक्शन लॅब’ आणि ‘द डी वाय यू शॉप’च्या संस्थापक आहेत.
-
देश-विदेशांतील शिक्षण व वैद्यकीय संस्था असोत अथवा नवी मुंबईतील भव्य क्रीडा संकुल; पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी ज्या ज्या क्षेत्रात पाऊल ठेवले, तिथे तिथे ठोस कामगिरी करीत आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: राजलक्ष्मी पाटील/इन्स्टाग्राम)
पोटात वाढलेली आठ किलो वजनी गाठ काढण्यात यश; ठाणे पालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाद्वारे शस्त्रक्रिया