-
घुबड हे जगातील सर्वांत आकर्षक पक्षांपैकी एक आहेत; परंतु सध्या अनेक प्रजाती अधिवासाचा ऱ्हास, जंगलतोड आणि हवामान बदलामुळे गंभीर धोक्यांचा सामना करत आहेत.
-
‘आंतरराष्ट्रीय घुबड जागरूकता दिना’निमित्त, तातडीने संवर्धनाची गरज असलेल्या जगातील काही अत्यंत दुर्मीळ आणि धोक्यात आलेल्या घुबडांबद्दल जाणून घ्या.
-
फॉरेस्ट आउलेट (रानपिंगळा)
एक शतकाहून अधिक काळ नामशेष मानला गेलेला रानपिंगळा १९९७ मध्ये भारतात पुन्हा आढळला, परंतु जंगलतोड आणि अधिवासाच्या विनाशामुळे मध्य भारतातील ही दुर्मीळ प्रजाती अजूनही धोक्यात आहे. -
लाँग-व्हिस्कर्ड आउलेट:
उत्तर पेरूच्या आढळणाऱ्या मेघाच्छादित जंगलांमध्ये आढळणारे आणि चेहऱ्यावरील मिशांसारख्या वैशिष्ट्यपूर्ण पिसांवरून ओळखले जाणारे हे जगातील अत्यंत दुर्मीळ घुबड जंगलतोडीमुळे अस्तित्वाच्या संकटाचा सामना करत आहे. -
पर्नांबुको पिग्मी आउलेट
ब्राझीलच्या झपाट्याने नष्ट होणाऱ्या अटलांटिक जंगलातील हे अतिशय दुर्मीळ घुबड भीषण जंगलतोडीमुळे वन्यजीव क्षेत्रातून आधीच नामशेष झाले असावे, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. -
ब्लेकिस्टन्स फिश आउलेट
रशिया, चीन आणि जपानमधील नदीकाठच्या जंगलांत राहणारे जगातील हे सर्वांत मोठे घुबड वृक्षतोड आणि प्राचीन जंगलांच्या ऱ्हासामुळे तीव्र संकटात सापडले आहे. -
सेशेल्स स्कॉप्स आउलेट
सेशेल्समधील फक्त माहे बेटावर आढळणाऱ्या या अत्यंत दुर्मीळ घुबडाची संख्या संवर्धन प्रयत्नांमुळे स्थिर झाली असली तरी अत्यंत मर्यादित अधिवासामुळे त्याच्या अस्तित्वाला अजूनही धोका आहे. -
सियाऊ स्कॉप्स आउलेट
इंडोनेशियाच्या सियाऊ बेटावर आढळणारे हे कमी माहिती असलेले घुबड अधिवासाचा ऱ्हास आणि ज्वालामुखीच्या धोक्यांमुळे अत्यंत संवेदनशील स्थितीत आहे.
दिवसा झोपणे चांगले की वाईट? चाणक्यांनी २ श्लोकातून सांगितले महत्व; जाणून घ्या अर्थ