-
आज संगणक असो वा मोबाईल, आपण सर्वच जण ‘QWERTY’ कीबोर्डवर वेगाने बोटे चालवतो; परंतु ही रचना संगणकांसाठी तयार केलेली नव्हती.
-
१५० वर्षांहून अधिक काळ लोटला तरी अनेक पर्यायांना मागे टाकत हीच रचना आजही जगभरात राज्य करीत आहे.
-
शोध आणि सुरुवात
१८७० च्या दशकाच्या सुरुवातीला ख्रिस्तोफर लॅथम शोल्स या अमेरिकन संशोधकाने पहिल्या यशस्वी टाईपरायटरसाठी QWERTY लेआऊट विकसित केला. -
तांत्रिक समस्या
सुरुवातीच्या टाईपरायटरमध्ये शेजारील बटणे वेगाने दाबल्यास त्यांच्या ?धातूचे हॅमर्स (typebars) एकमेकांत अडकून टायपिंगमध्ये अडथळा निर्माण होत असे. -
अक्षरांची पुनर्रचना
या समस्येवर मात करण्यासाठी शोल्सने वारंवार वापरली जाणारी अक्षरांची बटणे एकमेकांपासून दूर ठेवून, ती अडकण्याची शक्यता कमी केली. -
रेमिंग्टनचा सहभाग
१८७३ मध्ये ‘ई. रेमिंग्टन अँड सन्स’ कंपनीने आपल्या टाईपरायटरमध्ये हा लेआऊट स्वीकारल्याने त्याला मोठी लोकप्रियता मिळाली. -
पर्यायांवर मात
नंतरच्या काळात द्वोराक (Dvorak)सारखे अधिक वेगवान लेआऊट आले, तरीही QWERTY चा मोठा वापरकर्ता वर्ग आणि सवयींमुळे तो अव्वल स्थानावरच राहिला. -
संगणक युगातही वर्चस्व
टाईपरायटरच्या काळातील तांत्रिक मर्यादा संपल्यानंतरही शतकापूर्वीचा हाच QWERTY लेआऊट आज जगभरातील संगणक आणि मोबाईलवर कायम आहे.
पोटात वाढलेली आठ किलो वजनी गाठ काढण्यात यश; ठाणे पालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाद्वारे शस्त्रक्रिया