-
झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाचा प्रमुख चेहरा बनलेले देवेंद्र नाथ महतो यांनी उपोषणाचा मार्ग निवडल्यामुळे समर्थकांनी त्यांची तुलना प्रसिद्ध कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्याशी केली आहे.
-
आठवडे न् आठवडे चाललेल्या आंदोलनानंतरही सरकारने दखल न घेतल्याने देवेंद्र नाथ महतो यांनी २ ऑगस्टच्या रात्री रांची येथील जयपाल सिंग मुंडा स्टेडियमवर आमरण उपोषण सुरू केले.
-
रांची जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या देवेंद्र नाथ महतो यांनी बी.एड्. आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून, ते २०१५ पासून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सक्रिय आहेत.
-
विद्यार्थी राजकारणात सतत सक्रिय राहिलेल्या महतो यांनी २०२४ च्या झारखंड विधानसभा निवडणुकीत तमाड मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकही लढवली आहे.
-
५ जुलै रोजी जाहीर झालेल्या १४ व्या JPSC नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या निकालानंतर झालेल्या अनियमिततेच्या आरोपांमधून हे मोठे आंदोलन उभे राहिले आहे.
-
१४ वी JPSC परीक्षा रद्द करून संपूर्ण प्रकरणाची CBI आणि ED द्वारे सखोल चौकशी व्हावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी केली आहे.
-
शरीरात अशक्तपणा आला असला तरी न्यायासाठीचा निर्धार पक्का आहे, असे सांगत महतो यांनी हे आंदोलन पूर्णपणे शांततामय व संवैधानिक मार्गाने चालवण्याचे आवाहन केले आहे.
-
या विद्यार्थी आंदोलनाला कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांनीही व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधून पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: देवेंद्र नाथ/इन्स्टाग्राम)
Video: अभिजीत दिपकेंची PM मोदींच्या शिक्षणावर खोचक टिप्पणी! म्हणाले, “जर ‘pawpaw’नी त्यांची डिग्री दाखवली तर, मी उद्याच…”