-
तुकाराम मुंढे हे सनदी (IAS) अधिकारी असून सध्या ते अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
-
गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून त्यांनी संपूर्ण राज्यात भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात धडाकेबाज कारवायांचा सपाटा सुरू केला आहे.
-
त्यांच्या या कडक आणि पारदर्शक कारवायांमुळे ते नेहमीच प्रशासकीय वर्तुळात तसेच सर्वसामान्यांमध्ये चर्चेत असतात.
-
नुकत्याच लोकमतला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत त्यांनी आपल्या वैयक्तिक आवडीनिवडीबद्दल मोकळेपणाने भाष्य केले.
-
आपल्या आवडत्या पदार्थाबद्दल विचारले असता, “मला कोणता पदार्थ आवडतो हे सांगणं अवघड आहे,” असे ते म्हणाले.
-
पुढे बोलताना त्यांनी, “आई बनवायची, मराठवाड्यातले जे लोक आहेत त्यांना माहिती असेल, मसाला वडी नावाचा एक प्रकार आहे, ज्याला मासवडी असेदेखील म्हणतात.” अशी आठवण सांगितली.
-
त्यासोबतच, “किंवा पिठाचं वांगं हे मला आवडतं,” असाही उल्लेख त्यांनी आपल्या खाद्यसंस्कृतीबद्दल बोलताना केला.
-
“हे तिखट आहे का, तर हो अर्थात आहे; रोज नाही खाऊ शकत, पण कधीतरी खाण्यासाठी ठीक आहे,” असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.
-
(Photo: Facebook Tukaram Mundhe)
नेपाळ महापूर: ३० वर्षांपासून हिमालयाची भ्रमंती करणारे मुंबईचे ज्येष्ठ गिर्यारोहक डॉ. मिलिंद चितळे यांच्यासह कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेलेला ४० भाविकांचा समूह बेपत्ता