-
महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची नात आणि ‘राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)’ पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) व सदानंद सुळे यांची कन्या रेवती सुळे (Revati Sule) यांचा विवाह सारंग लखानी (Sarang Lakhani) यांच्याशी पार पडला.
-
या विवाह सोहळ्यानंतर दिल्लीमध्ये एका भव्य रिसेप्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
-
या कार्यक्रमाला देशपातळीवरील अनेक ज्येष्ठ राजकीय नेते, खासदार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून नवदंपतीला शुभाशीर्वाद दिले.
-
देशभरातील विविध पक्षांचे नेते, केंद्रीय मंत्री आणि शरद पवार यांच्याशी स्नेहाचे संबंध असणाऱ्या अनेक दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.
-
या रिसेप्शन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष उपस्थिती लावून नवदंपतीला शुभाशीर्वाद दिले.
-
गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील या रिसेप्शन सोहळ्याला उपस्थित राहून वधू-वरांना शुभेच्छा दिल्या.
-
काँग्रेसचे नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी-वड्रा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.
-
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहून नवदंपतीला शुभेच्छा दिल्या.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार आणि अमित शाह हे तिघे एकाच फ्रेममध्ये एकत्र बसलेले दिसल्याने राजकीय वर्तुळात व सोशल मीडियावर या फोटोची तुफान चर्चा रंगली आहे.
-
या आनंदाच्या सोहळ्यात पवार कुटुंबातील सर्व सदस्य आवर्जून सहभागी झाले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुप्रिया सुळे/इन्स्टाग्राम)
३ दिवसांपासून आतड्यात कुजतोय मल? हे छोटे काळे फळ खा, पोट होईल साफ