-
महाराष्ट्राचे ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांची नात रेवती सुळे व सारंग लखानी यांच्या विवाहानंतर दिल्लीत आयोजित भव्य रिसेप्शन सोहळ्यात देशातील अनेक दिग्गज नेते आणि व्हीआयपी मंडळींनी हजेरी लावून नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद दिले.
-
या दिमाखदार सोहळ्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी नेसलेल्या पारंपरिक आणि आकर्षक जांभळ्या रंगाच्या पैठणी साडीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
-
सोन्याचा समृद्ध पदर आणि पारंपरिक नक्षीकाम असलेल्या या पैठणी साडीत सुप्रिया सुळे यांचे सौंदर्य खूलून आले आहे.
-
साडीच्या रंगाशी सुसंगत असा सुरेख ब्लाऊज आणि गळ्यात परिधान केलेला पारंपरिक सोन्याचा चोकर हार त्यांच्या या संपूर्ण लूकला अधिकच भव्य बनवत होता.
-
लेकीच्या विवाह सोहळ्याच्या या आनंदी क्षणी सुप्रिया सुळे यांचा हा पारंपरिक महाराष्ट्रीयन पेहराव अतिशय खानदानी आणि अभिजात वाटत होता.
-
अतिशय साधेपणा आणि समृद्ध पारंपरिकतेचा सुंदर मिलाफ साधत त्यांनी परिधान केलेला हा लूक उपस्थितांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरला.
-
सुप्रिया सुळे यांचा हा मराठमोळा आणि देखणा अवतार दिल्लीच्या या व्हीआयपी सोहळ्यात संस्कृती व परंपरेची एक सुंदर झलक दाखवून गेला.
-
मुलीच्या लग्नातील या खास रिसेप्शन सोहळ्यात सुप्रिया सुळे यांचा हा पैठणी लूक अत्यंत प्रभावी, देखणा आणि सर्वांचे मन जिंकणारा ठरला.
-
(सर्व फोटो सौजन्य: सुप्रिया सुळे/इन्स्टाग्राम)
खवड्या डोंगरावरुन उडी मारल्याने झालेल्या चांदगुडे कुटुंबाच्या मृत्यूंचं गूढ कायम, आयफोन आणि हप्त्यांचं कारण नाहीच?