-
Revati Sule Sarang Lakhani Wedding Reception: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि सदानंद सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचा विवाह नागपूर येथील उद्योजक सारंग लखानी यांच्याशी संपन्न झाला.
-
विवाहसोहळ्यानंतर नवी दिल्ली येथे या नवदांपत्याच्या विशेष रिसेप्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
-
या सोहळ्यात रेवती सुळे यांच्या रूपात पारंपरिक मराठमोळ्या संस्कृतीचा आणि आधुनिक सौंदर्याचा एक सुरेख संगम पाहायला मिळाला.
-
रिसेप्शन सोहळ्यासाठी रेवती यांनी अत्यंत आकर्षक आणि भरजरी अशी लाल रंगाची पैठणी साडी साडी नेसली होती.
-
गळ्यात सोन्याची ठुशी व हार, कानातले आणि हातात हिरव्या काचेच्या बांगड्यांबरोबर सोन्याचे तोडे… असा अत्यंत साधा पण तरीही अत्यंत शाही लूक त्यांनी साकारला होता.
-
केसांचा नेटका आंबाडा आणि अत्यंत नैसर्गिक मेकअपमुळे रेवती यांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते.
-
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह देशातील प्रमुख राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते या नवदांपत्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : रेवती सुळे/इन्स्टाग्राम)
पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडणाऱ्या अभिनंदन वर्धमान यांची नवी इनिंग, गोव्यातल्या खासगी कंपनीत वैमानिक म्हणून कार्यरत