-
Kangana Ranaut Visited Siddhivinayak And Mumba Devi Temple: अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत.
-
पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधत कंगना यांनी मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर आणि मुंबादेवीचे दर्शन घेतले.
-
या आध्यात्मिक दर्शनाचे फोटो कंगना यांनी स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.
-
यावेळी कंगना यांनी नेसलेली केशरी रंगाची सुंदर कांजीवरम साडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
-
या कांजीवरम साडीबरोबर केसांत गजरा, कपाळावर लाल टिकली आणि नाजूक दागिने असा त्यांचा पारंपरिक लूक अत्यंत उठून दिसत होता.
-
आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कंगना यांनी घेतलेल्या या दर्शनाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
-
नागपंचमी आणि श्रावणी सोमवारी कंगना यांनी आपल्या घरी रुद्रअभिषेक आणि विशेष पूजेचे आयोजनही केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : कंगना रणौत/इन्स्टाग्राम)
दिशा सालियान हत्या प्रकरणात FIR मध्ये आदित्य ठाकरेंचं नाव; नेमकं कारण काय? संजय राऊत म्हणतात…