-
खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव विश्वराज आणि सून मंजिरी (अंजली) महाडिक यांना ६ मे रोजी कन्यारत्न प्राप्त झाले.
-
महाडिक कुटुंबात या चिमुकल्या पाहुणीच्या आगमनाने आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
-
कृष्णराज महाडिक यांनी पोस्ट केलेल्या खास ब्लॉगमध्ये याशिकाच्या नामकरण सोहळ्याचे आणि बारशाचे क्षण दाखवण्यात आले आहेत.
-
बारशाच्या या सोहळ्यासाठी आकर्षक फुलांची सजावट, गुलाबी फुगे आणि दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती.
-
पारंपरिक पद्धतीने औक्षण करत आणि पाळणा सजवून नामकरण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
-
कृष्णराज यांनी शेअर केलेल्या कौटुंबिक फोटोमध्ये महाडिक कुटुंबीय एकत्र येऊन आनंद साजरा करताना दिसत आहेत.
-
कृष्णराज महाडिक यांनी सोशली मीडियाद्वारे शेअर केलेल्या ब्लॉगमध्ये लहान बाळाचे नाव ‘याशिका’ठेवल्याचे जाहीर केले.
-
सोहळ्यात चिमुकलीचे ‘YAASHIKA’ हे नाव मोठ्या अक्षरांमध्ये भव्य आणि नेत्रदीपक पद्धतीने साकारण्यात आले होते.
-
महाडिक कुटुंबातील या नव्या सदस्याच्या बारशाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: कृष्णराज महाडिक/इन्स्टाग्राम)
घराच्या भिंतीत, छतावर किंवा पाईपच्या फटीत उगवलेलं वड वा पिंपळाचं झाड निघेल मुळासकट! मिठासह ‘हे’ सोपे उपाय करा; क्षणात होईल बंदोबस्त