-
भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी सहकुटुंब पंढरपूर येथे विठू माऊलीचे भावपूर्ण दर्शन घेतले.
-
यावेळी बोलताना धनंजय महाडिक म्हणाले, “विठू माऊलीच्या चरणी माथा टेकून सर्वांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. विठू माऊलीचा हाच आशीर्वाद नेहमी पाठीशी राहो, हीच सदिच्छा.”
-
पंढरपूर दर्शन घेतल्यानंतर त्यांनी सहकुटुंब महाराष्ट्राची कुलस्वामिनी, आदिशक्ती श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले.
-
देवीच्या तेजस्वी रूपाचे दर्शन घेऊन, त्यांनी पारंपरिक धार्मिक विधी आणि भक्तिभावाने देवीची खण-नारळाने ओटी भरून आरती केली.
-
“सर्वांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि भरभराट लाभावी, यासाठी आई तुळजाभवानीच्या चरणी साकडे घातले,” असेही महाडिक यांनी सांगितले.
-
धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक (Krishnaraaj Mahadik) हे भारतीय जनता युवा मोर्चाचे (BJYM) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत.
-
कृष्णराज महाडिक हे एक प्रसिद्ध युट्युबर असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर ते सामाजिक कार्यासाठी करतात; यामुळे तरुणांमध्ये त्यांची मोठी लोकप्रियता आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : धनंजय महाडिक/इन्स्टाग्राम)
शिवाजी पार्कवरील आंदोलनानंतर तक्रार दाखल होताच अभिजित दिपके यांचं प्रत्युत्तर; म्हणाले…