-
नलिनी पांडुरंग मुंबईकर (Nalinee Mumbaikar) या महाराष्ट्रातील एक लोकप्रिय फूड इन्फ्लुएन्सर, युट्यूबर आणि यशस्वी महिला उद्योजिका आहेत.
-
अलिबागच्या (Alibaug) पारंपरिक कोळी आणि आगरी खाद्यसंस्कृतीला त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात विशेष ओळख मिळवून दिली आहे.
-
सोशल मीडियावर त्यांना प्रेमाने ‘नलिनी काकू’ किंवा ‘कोळीनबाय’ म्हणून ओळखले जाते.
-
नुकतीच नलिनी यांची सून भाग्यश्री मोरेची (Bhagyashree More) लग्नानंतरची पहिली मंगळागौर उत्साहात साजरी करण्यात आली.
-
या मंगळागौरीच्या निमित्ताने नलिनी आणि भाग्यश्री यांनी केलेल्या पारंपरिक मराठमोळ्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
-
मंगळागौर हा आपल्या मराठी संस्कृतीतील एक आनंददायी सण आहे.
-
श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवार नवविवाहित स्त्रियांसाठी विशेष आनंदाचा आणि उत्साहाचा असतो.
-
मंगळागौर म्हणजे केवळ पूजा अर्चा नसून, ती आपल्या संस्कृतीतील श्रद्धा, परंपरा, सौभाग्य आणि स्त्रीशक्तीचा एक सुंदर मिलाफ आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : नलिनी मुंबईकर/इन्स्टाग्राम)
राज ठाकरेंच्या नातीचे थाटात नामकरण; अमित ठाकरेंनी कन्येचे ठेवले ‘हे’ ऐतिहासिक नाव