-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाचे युवा नेते युगेंद्र पवार आणि त्यांच्या पत्नी तनिष्का पवार हे दोघे नुकतेच धार्मिक प्रवासादरम्यान मोरगाव येथे पोहोचले होते.
-
त्यांनी अष्टविनायकांपैकी प्रथम स्थान असलेल्या बारामती तालुक्यातील श्री मयूरेश्वर देवाचे सपत्नीक मनोभावे दर्शन घेतले.
-
या धार्मिक दर्शनाचे खास फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून चाहत्यांसाठी पोस्ट केले आहेत.
-
फोटोमध्ये युगेंद्र पवार हे पारंपरिक पांढऱ्या रंगाच्या कुर्ता-पायजम्यामध्ये अतिशय प्रसन्न आणि रुबाबदार दिसत आहेत. तनिष्का पवार यांनी पिवळ्या रंगाचा आकर्षक पंजाबी सूट परिधान केला असून, त्यांचा हा साधा अन् पारंपरिक लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
त्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात देवाचे दर्शन घेताना आणि आरती करतानाचे फोटो शेअर केले आहेत.
-
फोटो पोस्ट करताना त्यांनी ‘अष्टविनायकांपैकी एक असलेल्या बारामती तालुक्यातील मोरगावच्या श्री मयूरेश्वराचे सपत्नीक मनोभावे दर्शन घेतले. बाप्पाच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
या फोटोंवर त्यांचे समर्थक आणि नागरिकाही लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: युगेंद्र पवार/इन्स्टाग्राम)
मी मराठीत मोजून १० सिनेमांमध्येही काम केलेलं नाहीये! स्मिता जयकर यांनी व्यक्त केली खंत, म्हणाल्या, “मी हिंदीत इंडस्ट्रीत…”