-
दरवर्षी २६ ऑगस्ट रोजी जगभरात ‘आंतरराष्ट्रीय श्वान दिन’ (International Dog Day 2026) साजरा केला जातो.
-
मानवी जीवनातील श्वानांचे स्थान, त्यांचे योगदान आणि प्राण्यांबद्दलची आपुलकी व्यक्त करणे हा हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.
-
या दिवसाची सुरुवात २००४ मध्ये प्राणीप्रेमी आणि पेट लाईफस्टाईल तज्ज्ञ कॉलीन पेज यांनी केली होती.
-
श्वान हे केवळ पाळीव प्राणी नसून संरक्षण दल, पोलीस यंत्रणा, शोध व बचाव कार्य, तसेच थेरपी (उपचार पद्धती) मध्ये मानवाला मोलाची मदत करतात.
-
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांची सून सानिया चांडोकने (Saaniya Chandhok) आंतरराष्ट्रीय श्वान दिनानिमित्त तिच्या घरातील श्वानांचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
हे फोटो शेअर करत सानियाने, “तुमचे कुत्रे सोबत असले की प्रत्येक दिवस आणखी सुंदर बनतो,” असे कॅप्शन दिले आहे.
-
सानिया ही ‘WVS’ कडून प्रमाणित झालेली व्हेटर्नरी टेक्निशियन (पशुकल्याण तंत्रज्ञ) आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सानिया चंडोक/इन्स्टाग्राम)
बऱ्हाणपूरहून आणलेली १२ फुटाची गणेशमूर्ती वाटेतच दुभंगली; जळगावातील मंडळावर स्थापनेपूर्वीच विसर्जनाची वेळ