-
Raksha Bandhan 2026: रक्षाबंधन हा भारतीय संस्कृतीतील भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचा, आपुलकीचा आणि संरक्षणाच्या वचनाचा सण आहे.
-
हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो, म्हणूनच याला ‘श्रावणी पौर्णिमा’ किंवा ‘राखी पौर्णिमा’ असेही म्हणतात.
-
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.
-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरीही रक्षाबंधनाचा मोठा उत्साह पाहायला मिळाला.
-
दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाकरे गटाच्या उपनेत्या व प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राखी बांधून शुभेच्छा दिल्या.
-
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीही धनंजय मुंडे यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
-
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांना त्यांच्या बहिणीने औक्षण करून प्रेमाची राखी बांधली.
-
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील इतर अनेक प्रमुख नेत्यांनीही रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला.
-
(सर्व फोटो सौजन्य : राजकीय नेते/इन्स्टाग्राम)
आतड्यांमध्ये कुजलेला मल झटक्यात पडेल बाहेर! फक्त माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने सांगितलेले ‘हे’ ४ सोपे उपाय करा; पोट होईल पूर्ण साफ!