-
कोल्हापूरचे भाजप राज्यसभा खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी आपल्या कुटुंबाबरोबर रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
-
भारतीय जनता युवा मोर्चाचे (BJYM) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक (Krishnaraaj Mahadik) यांनी या रक्षाबंधन सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
रक्षाबंधनाला बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची व सुख-समृद्धीची प्रार्थना करतात.
-
तर भाऊदेखील आयुष्यभर बहिणीचे रक्षण करण्याचे आणि प्रत्येक प्रसंगात तिला साथ देण्याचे वचन देतात.
-
या कौटुंबिक सोहळ्यात चिमुकल्या अमरेंद्र आणि यशिकाच्या पहिल्या रक्षाबंधनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
-
अमरेंद्र हा धनंजय महाडिक यांचे ज्येष्ठ सुपुत्र पृथ्वीराज महाडिक (Prithviraj Mahadik) आणि वैष्णवी महाडिक (Vaishnavi Mahadik) यांचा मुलगा आहे.
-
तर यशिका ही धनंजय महाडिक यांचे सुपुत्र विश्वराज महाडिक (Vishwwaraaj Mahadik) आणि अंजली महाडिक (Anjali Mahadik) यांची मुलगी आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : धनंजय महाडिक/इन्स्टाग्राम)
पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडणाऱ्या अभिनंदन वर्धमान यांची नवी इनिंग, गोव्यातल्या खासगी कंपनीत वैमानिक म्हणून कार्यरत