-
रक्षाबंधन सणादरम्यान मुंबईच्या महापौर रितू तावडे (Ritu Tawde) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केलेल्या विशेष फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
-
रक्षाबंधनानिमित्त रितू तावडे यांनी परिधान केलेली सुंदर पिवळ्या रंगाची साडी आणि चित्रा वाघ यांची जांभळ्या रंगाची साडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
-
हे फोटो शेअर करत रितू तावडे म्हणाल्या, “कधी मोठ्या बहिणीची माया तर कधी खंबीर मार्गदर्शकाची साथ… चित्रा ताईंची भेट म्हणजे नेहमीच एक वेगळा आनंद असतो!”
-
“आज ताईंची भेट झाली आणि व्यस्त दिनक्रमातून वेळ काढत आम्ही खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या.”
-
त्या पुढे म्हणाल्या, “त्यांच्याशी बोलताना मिळणारी आपुलकीची थाप आणि कामाप्रती असलेली त्यांची निष्ठा नेहमीच मला अधिक काम करण्याची प्रेरणा देते. समाजकारणातील विविध विषयांवर, अनुभवांवर आणि भावी योजनांवर ताईंशी खूप सकारात्मक चर्चा झाली.”
-
“ताईंच्या चेहऱ्यावरील तेच हसरे नेतृत्व आणि पाठीवर असणारा मायेचा हात हीच माझी खरी ताकद आहे.”
-
या सोहळ्यात रितू तावडे आणि चित्रा वाघ यांच्याबरोबर शिवसेना (ठाकरे गट) नेत्या किशोरी पेडणेकर यांची झालेली विशेष भेट आणि रक्षाबंधन सोहळा सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेचा विषय ठरला आहे.
-
कार्यक्रमादरम्यान रितू तावडे आणि चित्रा वाघ यांनी मुंबई महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना राखी बांधून व मिठाई वाटून रक्षाबंधन साजरा केले आणि त्यांच्या अमूल्य सेवेचा गौरव केला
-
(सर्व फोटो सौजन्य : रितू तावडे/इन्स्टाग्राम)
बऱ्हाणपूरहून आणलेली १२ फुटाची गणेशमूर्ती वाटेतच दुभंगली; जळगावातील मंडळावर स्थापनेपूर्वीच विसर्जनाची वेळ